Monday, March 1, 2010

..... या जगात सगळ्यांनाच .....

..... या जगात सगळ्यांनाच .....

या जगात सगळ्यांनाच हवं ते भेटत नसतं ....
आणि तरीही न भेटनार्या गोष्टींमागे मन का धावत असतं ?...
कधी जमिनीवर तर...
कधी उंच ढगांतच compromise करावं लागतं ....

इथे सर्वच जण स्वताच्या धुंदीत असतात ....
शब्द बरेचसे अड़कुन पडलेत ...
मनाच्या कोपर्यात ....
पण त्याना मोकळं करायाला ...
मित्र कुठेच नसतात ....

आकांशा सगळ्यांच्याच ...
भरपूर मोठ्या असतात ...
त्यांना पूर्ण इथे करायला सगळेच
दुसर्यांचा वापर करतात ...
पण आपल्या मदतीसाठी इथे क्वचितच ...
लोक आपल्याला भेटतात ...

स्वप्न पहायला रात्रीची झोप कमी पड़ते ...
त्यांना पूर्ण करायला दिवस भरची मेहनत कमी पड़ते ...
होतात स्वप्न पूर्ण तेव्हा ....
... जेव्हा ज्यांच्या बरोबर पाहिली
त्यांची कमी जाणवते ....

सगळ्यांनाच होतं प्रेम जगात ...
त्याची इथे काही कमी नाही ...
पण ज्यांच्या कडून असते अपेक्षा प्रेमाची ...
त्यांच्या कडून ते प्रत्येकाला भेटतच असं नाही ...

स्वप्नात आकाशातले तारे हातात दिसतात ...
पण reality मध्ये ... दिवसाच्या उजेडात ...
डोळ्यांसमोर अंधार दाटतो ...
आणि रात्रीचा चंद्र सुद्धा आगीच्या गोळ्यासारखा भासतो ...

होय ... सगळ्यांच्या म्हनण्याप्रमाने ...
वेळ नक्कीच सगळं normal करेल ...
पण गेलेल्या वेळेला Rewind मध्ये जावून ...
कोणी कसं change करेल???

1 comment:

madhu said...

Hi, khup chan kavita ahe