Thursday, July 8, 2010

..... कोणीतरी एकटा .....

..... कोणीतरी एकटा .....



जीवन पाण्याशिवाय,


पाणी पावसाशिवाय,


पाऊस सूर्याशिवाय,


सूर्य आकाशगंगेशिवाय,


आकाशगंगा पृथ्वीशिवाय,


पृथ्वी लोकांशिवाय,


लोक जात-धर्मांशिवाय,


जात धर्म मंदिरांशिवाय,


मंदिर देवान्शिवाय,


देव भाक्तांशिवाय,


भक्त हारांशिवाय,


हार फुलांशिवाय,


फूल सुगंधाशिवाय,


सुगंध वार्याशिवाय,


वारा झाडांशिवाय,


झाड निसर्गाशिवाय,


निसर्ग प्रेमाशिवाय,


प्रेम त्यागाशिवाय,


त्याग हृदयाशिवाय,


हृदय आपल्या माणसांशिवाय,


आपली माणसे नात्यांशिवाय,


नाती लग्नाशिवाय,


लग्न आवडीशिवाय,


आवड ओळखीशिवाय,


ओळख नावाशिवाय,


नाव कोणातरी शिवाय


आणि...


कोणीतरी तुझ्याशिवाय .....


एकटा आहे ......




..... प्रिये तुझ्या साठी ....

..... प्रिये तुझ्या साठी ....



प्रिये तुझ्या आठवनित काल चालत होतो ...

तेव्हा एका Bike ने मला ठोकले ...

हाताला जखम झाली आणि भरपूर रक्त वाहू लागले ...

रक्त वाया जाऊ नए म्हणून,

मी त्यानेच Love letter रखडले ...


या सगळ्या लफड्या नंतर...

मी डॉक्टर कड़े गेलो ...

त्याने पाच टाके लावले आणि,

बिलाचे पाचशे रूपये घेतले ...



प्रिये तू माझ्यात interested आहेस या नादात ...

मी नेहमीच तुला call करत राहिलो...

तुझा Reply नाही आला ...

तरीही मी SMS करत आहिलो ...

महिन्याभाराचा balance माझा,

आठवडयातच संपायला लागला ...


प्रिये तुझ्या साठी...

मी गुलाबाचं झाड लावणार आहे,

तुझा मला होकार असेल तर ...

तुझ्या केसांत गुलाब लावणार ...

नाहीतर फूलवाला बनून ...

माझे balance चे पैसे वसूल करणार आहे ...


प्रिये तुला भेटायला मी तुझ्या घरी येणार आहे ...

तुझ्या घरातल्यांना मी आवडलो तर ...

तुला मी perfume gift देणार ...

आणि नाही आवडलो तर salesman बनून ...

फेनोइल आणि Detergent विकून माझे...

Perfume चे पैसे वसूल करणार आहे ...


प्रिये तुझ्या आठवनित मी ...

एक chicken shop उघडणार आहे ...

तुझ्यावरचा राग ...

मी तिथल्या कोम्बड्यां वर काढणार आहे ...

पण तिथल्या अंड्यांना मी ...

माझ्या मनातल्या प्रेमासारखी जपनार आहे ...


बघ तुला आठवतात काय ते Pizza Hut's चे pizzas ...

आणि CCD 's च्या coffees ....

Natural's च्या त्या ice -creams ...

आणि मी तुला सांगितलेल्या त्या माझ्या Day dreams ...


प्रिये आपली झालेली प्रत्येक भेट ...

मला सुखद आठवण देऊन गेली ...

पण प्रत्येक वेळी माझ्या पाकिटातली ...

at least १०० रुपयांची नोट घेउन गेली ....