Tuesday, January 19, 2010

...... Collage कट्टा.....

...... Collage कट्टा.....


आमच्या Collage ला कट्टा नव्हता ,
आम्ही Basement मध्येच बसायचो ,
Lectures Bunk करायचो ,
तिथेच कट्टा enjoy करायचो ...

कोणाचीतरी Assignment आणायची ,
आणि सगळ्यांनी मिळून त्याची Handmade Xerox मारायची ,
समजतं तेवढं लिहायच ,
आणि bore झालं की गापची मारायची

बसल्या बसल्या मुलींना छेडायचे ,
किंवा नुसती Smileच द्यायची ,
Return मध्ये Smile आली ,
की तिच्याची Friendship करायची ...

मुलींबरोबर बोलणं तसं कमीच व्हायचं ,
कारण दिवसभरातल्या शब्दांचा कोटा
Assignment मध्येच संपायचा ,
Professors नेहमी पहायचे ,
कधी ओरडून Lectures ला पाठवायचे ...
कधी तर चक्क हसत हसत जायचे ...

कोणीतरी एखाद्याची Mimicry करायची ,
नाहीतर एखाद्याची fultoo मध्ये खेचायची ,
मग बसल्या बसल्या त्यालाच ...
एखादी diagram काढायला द्यायची ...

कट्ट्यावर एकतरी बकरा नेहमी यायचा ,
जो सगळ्यांसाठी ही Coffee मागवायचा ...
बिच्चारा Coffee प्रत्येकाच्या टेबल पर्यंत आणून द्यायचा ,
आणि सगळ्यांचे Coffeeचे bills सुद्धा pay करायचा ...

Fest's च्या गोष्टी करायच्या ,
Lectures ला Official सुट्ट्या घ्यायच्या ,
सगळ्यांनी बसून Scripts वर time-pass करायचा ,
चांगल्या Post साठी settings try करायच्या ...

कट्ट्यावरचे regular days बरे जायचे ,
पण Submission's च्यावेळेला वांदे व्हायचे ,
त्या दिवसांत कट्ट्यावर कोणी rareच दिसायचं ,
पण त्यात काय ....
नवीन sem मध्ये सगळे पुन्हा तिथेच यायचे ...

नाही राहिलं College आता ,
नाही राहिला त्याचा कट्टा ,
पण शेवटी त्याला म्हनायचं राहिलं ,
See you again, ... tata...

नाही आता कट्टा तरी ...
आम्ही मित्र एकमेकांना भेटतो ,
तर कधी Facebook वरच chat करतो ,
नाही केला SMS बरेच दिवस तरी ,
Orkut वर एखादातरी Scrap असतो ....