Tuesday, July 28, 2009

......... पाऊस म्हणजे .......




पाऊस म्हणजे .... प्रत्येकासाठी वेगळा अनुभव .... म्हणुन पाऊस म्हणजे प्रत्येकासाठी वेगळी Definition, काहींना त्याचा राग येतो ... तो नको नकोसा वाटतो ... तर काहींना तो एवढा आवडतो, वाटतं तो रोज रोज पडावा... तशाच काही दोन वेग-वेगळ्या विचारांचा पाऊस ...

......
पाऊस म्हणजे ......

पाऊस म्हणजे काळोख दाटणं, ढगांचा डणं,
विज कोसळणं, नद्या समुद्राच रागवणं ...

पाऊस म्हणजे हिरव पसरणं, श्रुष्टीचं हसणं,
निसर्गाचं बाहरणं, इंद्रधनुष्य दिसणं ...

पाऊस म्हणजे सगळी कड़े पाणीच पानी साचणं , झाडांचं पड़णं ,
Traffic jam, रस्त्यावर चिखल ...

पाऊस म्हणजे चिखलात Football
खेळणं, समुद्र किनारी फिरणं,
Water-Fall खाली मस्ती, कड़क चहा आणि गरमागरम भजी ...

पाऊस म्हणजे रस्त्यावर खड्डे, त्यात पाण्याचे साचने,
त्यातून गाड़ी गेली की, ते पानी कपड्यांवर उडून कपडे ख़राब होने ...

पाऊस म्हणजे रस्ता रंगीबेरंगी चत्र्यांनी झाकणं, कोणाला तरी भेटायला मनाचा हट्ट करणं,
पाऊस म्हणजे श्रावण, .... श्रावण म्हणजे Romance ....
म्हणुन कदाचित ... पाऊस म्हणजे Romance ....