...."ती " चा Call ....
काल अचानक तिने मला केला Call ,
आणि म्हटली थोडावेळ माझ्याशी बोल ...
तिने मला पहिल्यांदाच Call केला ,
म्हणुन मी ही Agree झालो बोलायला ...
नंतर तिने माझं नाव सांगितल ,
मी घाबरलो , अरेच्या हिने मला कसा ओळखलं ?? ...
ती म्हटली माझं नाव ......... आहे ,
माझं तुमच्या कड़े महत्वाच काम आहे ...
एवढ्या सुंदर आवाजात सांगितालेलं काम मीच काय कोणीही करेल ,
आणि मीही म्हटलं , सांग मी तुझ्यासाठी काहीही करेल ...
ती म्हटली की तू फार Lucky आहेस ,
आमच्या Bank चा Loan भेटायचा तुला Chance आहे ...
मग माझ्या लक्ष्यात आल की हिने मला Call का केला ,
Loan घ्यायला हिला सकाळ पासून कोणी बकरा नाही भेटला ...
मग मी ही लढ़वली शक्कल आणि म्हटलं ,
तुला पाहिजे तर मी घेतो Loan ,
पण एवढ Loan फेडेल कोण ??
तिने सांगितल घाबरू नको ,
तुझ्या Salary तुन जाईल ,
पाहिजे तर मी तुला सर्वात कमी "Interest" देइन ...
मी म्हटल "Interest" तर तू मलाच जास्त दे ,
कारण मी ही तुज्यात भरपूर Interested आहे ...
आणि राहील Salary च तर मला अजुन कोणी Salary देत नाही ,
कारण मला कोणी jobलाच घेत नाही ...
ती पटकन घाबरून म्हटली ,
ठीक आहे सर तुम्ही नका घेऊ Loan ,
बर मी आता ठेवते Phone ...
मी म्हटल पैशांच कशाला? ,
माझ्याबरोबर प्रेमाचं बोल ,
एवढं ऐकून तिने घाबरून ठेउन दिला Phone ....
No comments:
Post a Comment