Saturday, June 20, 2009

... असचं कधीतरी पावसाळ्यात ...




... असचं कधीतरी पावसाळ्यात ...

असचं कधीतरी पावसाळ्यात ,
सूर्य मावळताना संध्याकाळी ,
तू मला भेटायला येशील ...

थोड्याशा गारव्यात ,
गरम गरम Coffee पिताना ,
तू माझ्याबरोबर बराच वेळ गप्पा मारशील ...

Hotel च्या पायर्या उतरताना ,
तुझा पाय लचकला तर ,
तू अलगद तुझा हात माझ्या हातात देशील ...

रस्त्याने चालताना ,
अचानक पावसाच्या सरी कोसळायला लागल्या ,
की तू मला तुझ्या छात्रित बोलावाशील ...

पावसाच्या पडणार्या थेंबांना ,
तू तुझ्या गोर्या हातांत झेलशिल ,
आणि हळूच त्याना हसत हसत हवेत उड़वशील ...

थोडीशी भिज़लेली ,
थंडीने थोडीशी गारठलेली तू ...
... तू त्या पावसात किती सुंदर दिसशील ...

अशातच अचानक ढग ले ,
थोडीशी वीज डाली की ,
त्यांना घाबरून तू मला बिलगशील ...

घरी जायला उशीर होइल ,
या भीतीने तू घाबरशील ,
पण पुन्हा भेटायचं वचन देऊन जाशील ...

असचं कधीतरी पावसाळ्यात ,
सूर्य मावळताना संध्याकाळी ,
तू मला भेटायला येशील ...
... मी वाट पाहतोय ,
Hope तू मला Call करशील ....

No comments: