Monday, March 1, 2010

.... हीच Engineering आहे तर ....

.... हीच Engineering आहे तर ....

"यही ज़िन्दगी हैं तो क्या ज़िन्दगी हैं ...." ह्या traffic signal मधल्या गान्यावरून काहीसं inspired होउन मी ही कविता लिहली आहे ...

.... हीच Engineering आहे तर ....


.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?
कुठे admissions च्या रांगेत सुरु होते ...
कुठे घरांत पुस्तकांची रद्दी वाढवते ...
कुठे रॉकेल xerox च्या वासात गुदमरते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?


कुठे mechanics बनून Friction करते ...
कुठे maths बनून integrate करते ...
कुठे probability बनून सांभाळुन घेते ...
कुठे chemistry च्या reactions करते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?


कुठे physics चे laws विसरते ...
कुठे transistor च्या emitter- collector मध्ये confuse होते ...
कुठे Frequency bands मध्ये अड़कुन पड़ते...
कुठे physical memory नेहमीच full असते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?


कधी assignments बनून बरसत असते ...
कधी free lecture साठी तडपत असते ...
कधी submissions च्या वेळी वाट लावते ...
कधी लिहून लिहून बोटांना फोड़ आणते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?


कधी चालु lecture मध्ये झोपते ...
कधी रात्री रात्री जागवून घालवते ...
कधी वेळे पेक्षा जोरात धावते ...
कधी अशीच थांबून धावत्या वेळेकडे पाहत राहते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?


कधी KT बनून दुखावत राहते ...
कधी Golden attempt बनून सतावते ...
कधी circuit मधल्या current सारखी भटकत राहते ...
कधी drop बनून भरपूर रडवते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?


कधी vivas च्या वेळी निःशब्द करते ...
कधी practicals च्या वेळी साध्या साध्या readings चुकवते ...
कधी theory exams साठी रात्रं दिवस जागवते ...
तरी papers मध्ये कुठेतरी काहीतरी कमी राहते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?


कधी results च्या वेळी भीती ने घाबरवते ...
कधी तुटलेल्या स्वप्नांत टोचत राहते ...
कधी job साठी डोळ्यांत पाणी आणते ...
नेहमीच future च्या प्रश्नांत present ला मागे सारते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?.....

3 comments:

Nilesh said...

khup chaan

मराठीसूची said...

khoopach chan kavita aahe.khare aahe baba......
Add it to marathisuchi http://www.marathisuchi.com - free marathi link sharing website and marathi blogs aggregator.

Once your website is added to marathisuchi then your posts will be automatically published on marathisuchi.com

Akash Jaiswal said...

nice yar but some more comedy recqure.