..... काहीतरी करायचं राहिलं ......
जन्मलो तेव्हा रडत होतो.... मग हसायला लागलो ,
रेंगाळता रेंगाळता चालता आलं ,... मग उभा राहून धावायलाही लागलो ...
ग म भ न गिरवलं ... मग A B C D रखडली ...
दोनात चार मिळवले ... आणि त्यातून तीन वजा सुद्धा केले ...
जसा मोठा झालो तसे numbers सुद्धा मोठे झाले ,
+ आणि - बरोबर *, / आणि नंतर derivation, integration सुद्धा आले ...
पाढे रटले तेवढ्यात वर्ग मग... घन आले ...
गणित काय कमी होतं म्हणून अजुन विषय वाढवले ...
आधी O2, CO2, .... H2O मग ...
पूर्ण Periodic Table सुद्धा राटावे लागले ...
HCl ने कपड्यांना होल्स पाडले ,
Ammonia ( NH3) च्या वासाने डोके भीन भिनले ...
कांद्याच्या पातिने डोळ्यात पाणी आणले ,
अमिबा चे चित्र इतके सोपे होते की बंद डोळ्यांनी देखिल ते काढता आले ...
शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली ,
1857 च्या उठावानंतर भारतात स्वातंत्र्य संग्रामाची लाट पसरली ...
माणसाची उत्क्रांती कशी झाली? चीन मधे क्रांति कोणी केली ?
World War केव्हा केव्हा झाले? हिटलर ला कोणी व कसे मारले?
गांधी, नेहरू, टिळक, आंबेडकर, वल्लभभाई पटेल...
हे सगळे सुद्धा इतिहासात येउन गेले ...
भारताचे कायदे आणि घटना , नेहमीच पेपरात 10 मार्क्स ला आल्या,
माणसाचे मुलभुत हक्क आणि गरजा , नागरिक शास्त्रात धडा दुसरा पान नंबर सतरा ...
भूगोलात वाळवंट, पठार ... दगड मात्यांचे वेगवेगळे प्रकार ,
विषुवृत्ताच्या पट्यात ऊन , तर अंटार्टिका मधे ठंडी फार ...
नैऋत्य मानसून वारे कशामुळे वाहतात ?
आफ्रिकेच्या जंगलात कुठले वन्यजीव आढ़ळतात ?
पृथ्वी वर 71 टक्के पाणी आणि 29 टक्के जमिन आहे ...
असं आहे, तर माणूस चंद्रावर जाण्यापेक्षा पाण्यात रहायला का शिकत नाही ?
Faraday's, Norton's, Ohm's आणि Coulomb's Laws झाले ...
Einstein च्या current ने नेहमीच shock दिले ...
KVL, KCL circuits मधे टाकुन voltages काढले ...
Y, Z, H, आणि Laplace Transforms सुद्धा काढले ...
Acceleration, velocity, force, friction, truss, strain आणि stress वगैरे वगैरे ...
काढता काढता calculator चे सेल्स सुद्धा संपले ...
आत्तापर्यंत केलेले numbers फ़क्त Decimal होते म्हणून कदाचित ...
Binary, Octal आणि Hexadecimal मधे तेच numbers वेगवेगळे दाखवले ...
BJT, FET, JFET च्या fabrication steps पाहिल्या आणि circuits सुद्धा बनवले ...
8085, 8086 पासून ते मग micro controller चे सुद्धा programs केले ...
C, C++, java, Oracle.... SQL ...या सुद्धा Languages होत्या ...
कोणत्या Radar साठी कोणती आणि Broadcasting साठी Antenna कोणत्या होत्या?
Call splitting पासून Inter cell, intra cell, hard, soft handoffs सुद्धा झाले ...
Call Transfer पासून satellite phones चे सगळे concepts आणि working principle समजुन घेतले ....
त्यांनी आधी digital communication मग networking शिकवलं ,
नंतर secure communication साठी Securities ला सुद्धा syllabus मधे टाकलं ...
सगळे म्हटले तेच कर जे पुस्तकात लिहलय ,
मी ही तेच कल जे सगळ्यांनी केलय ...
या सगळ्यात कुठेतरी काहीतरी करायचं राहून गेलय ,
सगळ्यांच ऐकलं ... पण या सगळ्यांत मनाचं ऐकायाच राहून गेलय ...
सगळ्यांच ऐकण्यात आयुष्य जायला नको ...
म्हणून आता मनाचं ऐकायचं ठरवलय ...
इकडच्या या "Narrow Minded" गल्ल्या संपतच नाहित ...
म्हणून मग आता वेगळ्याच रस्त्याने जायचं ठरवलं ...
कोणी साथ दिली की त्यांच्या बरोबर ...
किंवा एकट्यानेच लढ़ायचं ठरवलय ...
No comments:
Post a Comment