Friday, June 19, 2009

....... माझं तुझ्यावर प्रेम नाही...


....... माझं तुझ्यावर प्रेम नाही...



नेहमी तुझ्याशी बोलावसं वाटतं ,
तुला मनातल सगळं सांगावसं वाटतं ,
तुझ्याबरोबर बोलल्यावर फार छान वाटतं ,
आणि तू .... तू फक्त माझ्याबरोबर बोलत राहवसं वाटतं ....
कारण तू ...... तू माझा चांगला मित्र आहेस .....
पण नाही रे .... माझ तुझ्यावर अजिबात प्रेम नाही ....

तुला नेहमी पाहवसं वाटतं ,
तुझ्याबरोबर कुठेतरी लांब फिरायाला जावसं वाटतं ,
तुझा सहवास नेहमी भेटावासा वाटतो ,
तुझा स्पर्ष देखिल मला हवाहवासा वाटतो ,
..
कारण तू ...... तू माझा चांगला मित्र आहेस .....
पण नाही रे .... माझ तुझ्यावर अजिबात प्रेम नाही ...

तू नसताना एकटेपणा जाणवतो ,
भरपूर आनंदात देखिल ... राडावसं वाटतं ,
तूच माझ्या सर्वात जवाळचा आहेस ....
तुझ्यावरच माझा सर्वात जास्त विश्वास आहे ...
...कारण तू ...... तू माझा चांगला मित्र आहेस .....
पण नाही रे .... माझ तुझ्यावर अजिबात प्रेम नाही ....

No comments: